श्रीधर अंभोरे हे नाव महाराष्ट्राला नवं नाही. त्यांची रेषा ही त्यांच्या चित्रकलेच्या अपार प्रेमांतून आणि दीर्घ रियाझातून पक्की झालीय. तसं पाहिलं तर रंग-रेषांचं कोणतंही पठडीतलं शिक्षण त्यांनी घेतलेलं नाही. अस्सल कलाकाराच्या आतच कला दडलेली असते, ती उमलून येतेच. श्रीधर अंभोरेंच्या बाबतीत हेच तर म्हणावं लागेल. आपल्या चित्रशैलीनं कलाक्षेत्रात आपली ओळख पक्की करणाऱ्या या चित्रकारानं वयाची पंचाहत्तर वर्ष पूर्ण केलीत. स्वतःचं आयुष्य चित्रांमधे गुंफणाऱ्या या चित्रकाराचं हे शब्दचित्र!
.
- महावीर जोंधळे
मनोज आहेर यांनी घेतलेली श्रीधर अंभोरे यांची मुलाखत