तिमिराची रेषा : महावीर जोंधळे

श्रीधर अंभोरे हे नाव महाराष्ट्राला नवं नाही. त्यांची रेषा ही त्यांच्या चित्रकलेच्या अपार प्रेमांतून आणि दीर्घ रियाझातून पक्की झालीय. तसं पाहिलं तर रंग-रेषांचं कोणतंही पठडीतलं शिक्षण त्यांनी घेतलेलं नाही. अस्सल कलाकाराच्या आतच कला दडलेली असते, ती उमलून येतेच. श्रीधर अंभोरेंच्या बाबतीत हेच तर म्हणावं लागेल. आपल्या चित्रशैलीनं कलाक्षेत्रात आपली ओळख पक्की करणाऱ्या या चित्रकारानं वयाची पंचाहत्तर वर्ष पूर्ण केलीत. स्वतःचं आयुष्य चित्रांमधे गुंफणाऱ्या या चित्रकाराचं हे शब्दचित्र!

महावीर जोंधळे

सौंदर्य शास्त्रासंबंधी अनेकाची अनेक मते आहेत. मतांतराशिवाय एखाद्या विषयाची सखोल चर्चा होऊ शकत नाही. हे अगदी स्वाभाविक दृष्ट्या बरोबर आहे. त्याशिवाय आपण ज्या कलावंताविषयी चर्चा करतो त्याचा भावनात्मक धागा आपल्या हाती कसा येणार? मग कला कोणतीही असो. त्याच्यातील विविध रसपूर्ण अंगाची ओळख झाली पाहिजे. रसग्रहाणाचे भावनिक स्तर वेगवेगळे असू शकतात. शरद पाटील यांच्या शास्त्रशुद्ध विवेचनात बसणाऱ्या श्रेष्ठ कलावंताचा विचार परंपरागत सौंदर्यात बसवता येत नाही. असा महत्त्वाचा चित्रकार म्हणजे श्रीधर अंभोरे. त्याचं नातं रेषेशी आहे. ही रेषा सुक्ष्मात सुक्ष्म जशी असते तशी ती लय पातळीवर चित्ररसिकांना घेऊन जाताना दिसते. ती कलेसाठी कला या चौकटीत मावणारी असत नाही. हे अनुमान काढताना त्यांनी चित्रबद्ध केलेल्या चित्रमालिका डोळ्यासमोर आणाव्या लागतात. विषयानुरूप स्वीकारलेला भवताल केवळ रेषाच्या आधारानं सजीव करीत असताना तो परंपरागत रंगशारदेच्या संकल्पने पासून तो स्वतःला अलगद बाजूला काढतो. रेषानं फक्त कॅनव्हास अर्थपूर्णतेन व्यापून टाकणं त्याला जमतं. त्याचं चित्र सनातन्यापासून दूर राहातं त्याचं कारण त्याच्या चिंतनात आहे. म्हणून तो ज्या रेषेच्या माध्य कागदावर उतरतो, ते उतरणं त्यांचं असतं. ती त्याची जगण्याची
मांडणी असते. जगण्याची मांडणी म्हणजे काय, तर तो अनाठायी गुढवादाला जवळ जात नाही. विनाकारण प्रतिकाला नृत्यही करू देत नाही. शैलीतील जीवंतपणाचा आभ्यास विषयातील अंतत्मातून आलेला असतो. त्याचा कार्यकारण भाव जगण्यातील साधेपणात आहे.

श्रीधर अंभोरे यांच्या रेखा रेषांचे विषय अगदी साधे वाटत असले तरी, साधे नेहमीच विशिष्ट शैलीत पकडणे सोपे असत नाही. त्याच्या सुरूवातीच्या चित्रापासून (१९७२ ते २०२१) पर्यंत विचार केला तरी कलारसिकांना हेच दिसेल, मोकळ्या हातानं ही चित्रे येत नाहीत. ते भरभरून देत जातात. आकाश, अवकाश आणि बहुपाश सुद्धा. एका ठिकाणी श्रीधर अंभोरे यांनीच सांगितलं आहे की, ढिगभर कागद आणि निवान्त खोली असली की झालं. मग पोस्टाच्या खिडकीतून दिवसभर बघितलेले चेहरे त्यांच्या स्वभावानुसार येतात. माध्यमाचा विचार न सांगता. अषा वाहक असते. अशावेळी जनसमुदाय असो की घटनाक्रमातील परिवार आलेला असतो घट्ट अशी भावना घेऊन. कल्पक सजावट कमी असते. ज्येष्ठ तत्त्वज्ञ शरद पाटील त्या बहुजनाच्या वास्तवादाचं सौंदर्यशास्त्र म्हणतात. ही श्रीधरच्या चित्रशैलीचा विचार करता पाटील यांचं कलेविषयीचं म्हणणं रास्त आणि स्पष्ट वाटतं. चित्रात वृक्ष आला तर त्याचं चिंतन
वेगळं असतं.वृक्षाच्या खोडात, पानात आणि फांदीत श्रीधरच वसलेला असतो. शतकानुशतके न आलेला विषय सोप्या आणि साध्या पण सशक्त रेषेतून जेव्हा आकाराला येतो तेव्हा ती श्रीधर शैली म्हणून त्याचं स्वतंत्र आकलन होत जाते. उपेक्षलेल्या विषयाची निवड करणं हा त्याच्या स्फटिकीमनाचा स्थायी भाव म्हणूनच रसिकासमोर आलेला असतो. तर्काच्या आधारे ते श्रीधरचं चित्र म्हणून ओळखले जाते. रंगावर्तनात गुंतुन न पड़ता कृष्णवर्णिय जीवंत रेषेतून तो माणूस कुठली कुठं नेवून ठेवतो. मग त्याची खानदानी रेषा रसिक म्हणून आपणही जीवापाड जपायला शिकतो.

गुरं, ढोरं, वाडा गोठा, कामगार, शेतकऱ्या भोवतालचा निसर्ग डोळ्यात भरून घ्यावासा वाटतो. त्याचं प्रमुख कारणच त्याचा सृष्टीज्ञानात आहे. असं वाटतं. वैयक्तिक पातळीवर जाऊन विश्लेषण करण्यातच एक वेगळा आनंद असतो. लोकसंस्कृती चौकटीत कधीच बसवता येत नाही कारण ती मैलोन मैल पसरलेली आहे. ती बहुव्याप्त आहे. उच्चभ्रून ती आपली मानलेली नाही. एखादा, दुसरा कलावंत सोडला तर. अगदी मूर्त, अमूर्तवादाचा विचार केला तरी. अप्रत्यक्ष सहजीवनाचा विचार केला तरी चित्रकलेच्या नावाखाली तो भुलभुलैया नसतो. ते आफाट पसरलेले लोकजीवनच असते. त्यातून सजग झालेला भवताल अखंड भारतीयाला हाक घालताना दिसतो. वेगळी प्रतिमा निर्माण करीत जातो. तीही अतिशय समर्पकपणे, बहुसंख्य आणि अल्पसंख्य यातील दरी, त्या दरीत घुमणारा आकान्त अबोल असला तरी कळत जातो. (उघळणारा बैल, बाभळीच्या पानावर तुटून पडलेल्या शेळ्या झाडगर्द सावली इत्यादी चित्रातून). आणि तेच त्याचं वैभव आहे. म्हणणच संयुक्त ठरेल. नख वाढवलेल्या माणसाच्या मनातील आक्रोशी व्यवहार असो की कैस मोकळी सोडून त्याचं उन्हात वाळवण घालणारी एखादी आदिवासी तरूणी. ती ज्या दगडावर ऊन्ह खात बसलली असते त्याचं वैरागी वैभव बघितलं तर दिसतच नाही का?

श्रीधरची पहिली भेट झाली आदिम अंकामुळे ख्यातनाम अभिनेता •सदाशिव अमरापूर याच्या मदतीनं त्यानं आदिमचा संसार मांडला होता. त्यातील चित्रामुळे तो जवळ आला मित्र झाला. मग त्याला मोठमोठ्या नद्या आवडतात. निरनिराळ्या आकाराचे दगड, घोंडे आवडतात.  तो त्यांच्या जीवनाच्या विकासाची पूर्ण काळजी घेताना दिसतो. अर्थात चित्र रेखाटताना. ती त्याची रेषा तगमगीची असते. व्यक्ती रेखेच्या जिवणीवरील ओल जिवंतही असते आणि शुष्कही असते. कोरड्या आणि वाहाणाऱ्या ओढ्यासारखी. ते चित्रकाराच्या मनातील घर असतं. उभं आडवं. ती त्यांनी काढलेल्या रेषांची रीत असते. ती सहजपणे उमगत जाते. त्यांनी चितारलेल्या बुद्धाच्या विविध गोष्टीचही तसंच वाटनं. त्याची तारीफ होताना दिसते. श्रीधर ज्या मातीला जसा माणूस लागतो तसा तो पेरत राहातो. माणसाचं उगवून येणं हे त्याच्या बोटात असलेल्या रेषेत असतं, म्हणून त्याची बोटं आणि रेषा अपेक्षापूर्ती करीत आले आहेत. माणसा माणसातला, प्राण्या प्राण्यातला, दुरावा जीवंत असल्याचा भास जेव्हा चित्र बघताना होतो तेव्हा त्यातील मुकेपण जातं अन् येतं ते बोलकंपण, विषण्णात ही एक प्रकारची सावलीच पाडते चित्रावर (पोतराज, सुया विवं विकणारी स्त्री, गरगर फिरणारा गोंधळी, नंदी आणि त्याच्या सारखा मान डोलवणारा माणूस. सांस्कृतिक दूत वाटतात. चित्रांचे प्रकार सांगताना आपली दमछाक होते. मग प्रश्न पडतो आदर्श काय?)

चित्रकलेत अनुभव प्राधान्यापेक्षा अभिव्यक्तीला अग्रक्रम देणारा श्रीधर वाटतो. विचार प्राधान्याच्या अंगानं जाणीव संपन्त्रता आणणं हा त्याच्या मनातील संकल्पनेचा एक भाग असतो. जो रूपात प्रसरणशील होतो. प्रत्येकाच्या जीवनात उत्पन्न होणारी पोकळी ही तशी आकारहीन असते. त्या आकारहीनतेचं मोठेपण ज्या रेषेला कळलेलं आहे. ती रेषा कोणाची तर ती श्रीधर अंभोरेची. राग, अहंकाराची शेडही तो सहजतेनं देऊन जातो. त्याला फार तर शैलीची हातोटी म्हणता येईल. सामाजिक जीवनात निर्माण झालेल्या सामाजिक जीवनाचं तंतोतंत दर्शन होत जातं त्याच्या सांगोपांग शैलीतून त्यांनी चितारलेल्या वाड्याच्या पडक्या भिती घडाघडा वारसाचा इतिहास कथन करताना दिसतात. त्या इतिहासात तडफड असते. यश आणि अपयश असतं. चित्रातील अबोलच संपतं चौकटीच्या आधारानं पडक्या वाड्याच्या भिंतीवर हातपाय पसरणाऱ्या गार गार वेलीच, त्या वेळीच आधुनिक युगाशी काही नातं नसतं हे वेगळं असतं. वृक्षाच्या खोडात, पानात आणि फांदीत श्रीधरच वसलेला असतो. शतकानुशतके न आलेला विषय सोप्या आणि साध्या पण सशक्त रेषेतून जेव्हा आकाराला येतो तेव्हा ती श्रीधर शैली म्हणून त्याचं स्वतंत्र आकलन होत जाते. उपेक्षलेल्या विषयाची निवड करणं हा त्याच्या स्फटिकीमनाचा स्थायी भाव म्हणूनच रसिकासमोर आलेला असतो. तर्काच्या आधारे ते श्रीधरचं चित्र म्हणून ओळखले जाते. रंगावर्तनात गुंतुन न पड़ता कृष्णवर्णिय जीवंत रेषेतून तो माणूस कुठली कुठं नेवून ठेवतो. मग त्याची खानदानी रेषा रसिक म्हणून आपणही जीवापाड जपायला शिकतो.



गुरं, ढोरं, वाडा गोठा, कामगार, शेतकऱ्या भोवतालचा निसर्ग डोळ्यात भरून घ्यावासा वाटतो. त्याचं प्रमुख कारणच त्याचा सृष्टीज्ञानात आहे. असं वाटतं. वैयक्तिक पातळीवर जाऊन विश्लेषण करण्यातच एक वेगळा आनंद असतो. लोकसंस्कृती चौकटीत कधीच बसवता येत नाही कारण ती मैलोन मैल पसरलेली आहे. ती बहुव्याप्त आहे. उच्चभ्रूंनी ती आपली मानलेली नाही. एखादा, दुसरा कलावंत
सोडला तर. अगदी मूर्त, अमूर्तवादाचा विचार केला तरी. अप्रत्यक्ष सहजीवनाचा विचार केला तरी चित्रकलेच्या नावाखाली तो भुलभुलैया नसतो. ते अफाट पसरलेले लोकजीवनच असते. त्यातून सजग झालेला भवताल अखंड भारतीयाला हाक घालताना दिसतो. वेगळी प्रतिमा निर्माण करीत जातो. तीही अतिशय समर्पकपणे, बहुसंख्य आणि अल्पसंख्य यातील दरी, त्या दरीत घुमणारा आकान्त अबोल असला तरी कळत जातो. (उघळणारा बैल, बाभळीच्या पानावर तुटून पडलेल्या शेळ्या झाडगर्द सावली इत्यादी चित्रातून). आणि तेच त्याचं वैभव आहे. म्हणणच संयुक्त ठरेल. नख वाढवलेल्या माणसाच्या मनातील आक्रोशी व्यवहार असो की कैस मोकळी सोडून त्याचं उन्हात वाळवण घालणारी एखादी आदिवासी तरूणी. ती ज्या दगडावर ऊन्ह खात बसलली असते त्याचं वैरागी वैभव बघितलं तर दिसतच नाही का?
श्रीधरची पहिली भेट झाली आदिम अंकामुळे ख्यातनाम अभिनेता •सदाशिव अमरापूर याच्या मदतीनं त्यानं आदिमचा संसार मांडला होता. त्यातील चित्रामुळे तो जवळ आला मित्र झाला. मग त्याला मोठमोठ्या नद्या आवडतात. निरनिराळ्या आकाराचे दगड, घोंडे आवडतात.  तो त्यांच्या जीवनाच्या विकासाची पूर्ण काळजी घेताना दिसतो. अर्थात चित्र रेखाटताना. ती त्याची रेषा तगमगीची असते. व्यक्ती रेखेच्या जिवणीवरील ओल जिवंतही असते आणि शुष्कही असते. कोरड्या आणि वाहाणाऱ्या ओढ्यासारखी. ते चित्रकाराच्या मनातील घर असतं. उभं आडवं. ती त्यांनी काढलेल्या रेषांची रीत असते. ती सहजपणे उमगत जाते. त्यांनी चितारलेल्या बुद्धाच्या विविध गोष्टीचही तसंच वाटनं. त्याची तारीफ होताना दिसते. श्रीधर ज्या मातीला जसा माणूस लागतो तसा तो पेरत राहातो. माणसाचं उगवून येणं हे त्याच्या बोटात असलेल्या रेषेत असतं, म्हणून त्याची बोटं आणि रेषा अपेक्षापूर्ती करीत आले आहेत. माणसा माणसातला, प्राण्या प्राण्यातला, दुरावा जीवंत असल्याचा भास जेव्हा चित्र बघताना होतो तेव्हा त्यातील मुकेपण जातं अन् येतं ते बोलकंपण, विषण्णात ही एक प्रकारची सावलीच पाडते चित्रावर (पोतराज, सुया विवं विकणारी स्त्री, गरगर फिरणारा गोंधळी, नंदी आणि त्याच्या सारखा मान डोलवणारा माणूस. सांस्कृतिक दूत वाटतात. चित्रांचे प्रकार सांगताना आपली दमछाक होते. मग प्रश्न पडतो आदर्श काय?)

चित्रकलेत अनुभव प्राधान्यापेक्षा अभिव्यक्तीला अग्रक्रम देणारा श्रीधर वाटतो. विचार प्राधान्याच्या अंगानं जाणीव संपन्त्रता आणणं हा त्याच्या मनातील संकल्पनेचा एक भाग असतो. जो रूपात प्रसरणशील होतो. प्रत्येकाच्या जीवनात उत्पन्न होणारी पोकळी ही तशी आकारहीन असते. त्या आकारहीनतेचं मोठेपण ज्या रेषेला कळलेलं आहे. ती रेषा कोणाची तर ती श्रीधर अंभोरेची. राग, अहंकाराची शेडही तो सहजतेनं देऊन जातो. त्याला फार तर शैलीची हातोटी म्हणता येईल. सामाजिक जीवनात निर्माण झालेल्या सामाजिक जीवनाचं तंतोतंत दर्शन होत जातं त्याच्या सांगोपांग शैलीतून त्यांनी चितारलेल्या वाड्याच्या पडक्या भिती घडाघडा वारसाचा इतिहास कथन करताना दिसतात. त्या इतिहासात तडफड असते. यश आणि अपयश असतं. चित्रातील अबोलच संपतं चौकटीच्या आधारानं पडक्या वाड्याच्या भिंतीवर हातपाय पसरणाऱ्या गार गार वेलीच, त्या वेळीच आधुनिक युगाशी काही नातं नसतं हे वेलीच अनाथपण पडक्या वाड्याच्या चिरेबंदी दगडालाही उमगत असावं घडी न मोडलेल्या शर्टाला कदाचित ते कळत नसावं. शब्दालयाच्या दिवाळी अंकातील आदिवासी स्त्री, तिच्यात दिसणारा पार्वतीच्या रूपातील खेळ आणि शंकराच्या भासमय लकबीतून ते चित्र इसके अर्थवाही झालं होतं की, त्या संबंधी श्रीधर म्हणतो. आग्रहाने सांगतो की, ते चित्र कसं बघितलं पाहिजे ते. आदिवासी लकबीतील संचलता पेहरावात, सावलीत, अंगाला लागलेल्या मातीत, आदिवासी लावण्य अनेक रूपातून बघण हा एक वेगळा आनंद असतो. (ज्वारीचं कणीस आणि कापसाच्या बोंडाच्या चिमुटभर रेषेत पकडताना समर्थ कलावताच साधंसुधं जगणं लक्षात घ्यायला ही चित्र भाग पाडतात. त्यातल्या त्यात वडाचं झाड त्याला अधिक जवळचं वाटतं. भाऊबंद असल्यासारखं. त्यातील अर्थासह ते मनातल्या घरात येऊन बसलेलं असते. लोंबकळणाऱ्या पारंब्यासह. जीवमात्राला कवेत घेवून इथं सौंदर्यशास्त्र काय असतं ते कळून चुकतं, कारण ते सर्वव्यापी असतं. मग प्रश्न उरतो श्रीधरच्या कलेला कोणत्या मानवी श्रेणीत बसवायच?) खरं म्हणजे त्याला कोणाच्याही पंक्तीत बसवता येत नाही. कारण त्यांनी पकडलेला जीवनकलह अन्य कोणालाही पकडता आलेला नाही. (अन्न पाण्यासाठी कोव्हीडच्या काळात अनवाणी फिरणारी माणसं फुटलेल्या मडक्याच्या काठावर बसलेला कावळा, उघड्या चोचेतून आभाळाकडं काही तरी मांडतो आहे, मोठ्या दगडावर निसर्गानं रचलेली चेहरा हरवलेल्या चित्र-विचित्र आकाराची उतरंड, मस्तवाल बैलानं धुळीतून काढलेली रांगोळी, वेळीचं नाजूकपण, आनाथ पानांची झळझळ आणि तगमग, पंख झडून गेलेला मोर, उंच उभारलेल्या, फडफडणाऱ्या झेंड्याखाली दबली गेलेली माणसं अस्तित्त्व हरवलेली. अशा रेशाचित्रांतून एक प्रकारचं अस्तित्त्व नसलेल्या माणसाचं जगणं, मरण कळून येतं. तेही सर्वव्यापी संवेदना मार्ग विस्तीर्ण करणारी ही चित्रे कायम लक्षात राहातात.)

श्रीधरची साधनं कमी आणि साधना जास्त हे सकृतदर्शनी दिसतं. निर्मिती प्रक्रिया जवळून पाहाता आली तेव्हा. रूढ अर्थाने त्याला स्टुडिओ लागत नाही. कुंचल्याशी मैत्री करावी लागत नाही. रंगान भरलेल्या हातातून कोणताही आर्विभाव प्रवाहित होत नाही. हे सगळं ज्याला अमान्यचं आहे. तो आत्मबाह्य एक असतो. मनात जे बागगलेलं आहे त्याचं संग्रहालय म्हणजे श्रीघर, असं ओघानेच म्हणावं लागतं. आणि तेच रास्त होईल देखील. कारण स्वयंसिद्ध रेषाच त्याचं भांडवल आहे. संगद्रव्य नाही. ग्रंथसंदभपिक्षा समाज संदर्भाला महत्त्व प्राप्त करून देणारे तत्वचिंतक शरद पाटील म्हणतात, संस्कृती परंपरेचा विचार करणं स्वतंत्र प्रज्ञा असलेल्यांनी कादापिही विचार करू नये, कारण समाजाच्या एकाच प्रभावाची छाया कलाकृतीवर पडण्याची शक्यता असते. त्याचा असं म्हणण्याचा हेतू अधिक स्पष्ट होतो तो कलेकडं पाहाण्यातून, शरद पाटीलांचं हे म्हणणं आठवण्याचे कारण म्हणजे श्रीधरच्या चित्रांना वैशिष्ट्य बोधनात अडकविता येत नाही. मुळातच त्याच त्याच मूल्यमापण पद्धतीलादूर ठेवूनच त्याच्या चित्रांच्या गुणवैशिष्ट्यांसंबंधी नव्यानं मांडणी करण्याची गरज आहे.

माणसातील आक्रमक स्वार्थ, दुषित मनांचा व्यवहार, भोगवादी व्यवहार, निर्दयी पसाऱ्यात दिसणारा एक प्रकारचा काळोख तो काळरंगातून पकडतो. अगदी समर्थकपणे, कलेच व्यावसायिकरण न करता. विचारपणाला न बदलता, चित्रांच्या विषयाची नवी मांडणी करता येते हे श्रीधरनं दाखवून दिलं आहे. (हंसच्या अनेक दिवाळी अंकातून)

श्रीधर अंभोरेच्या स्वभावचित्रासाठी एक शेर आठवतो! वतन के इश्क मे जीना, वतन के इश्कमे मरना, या ओळी कायम ठेवून असंही म्हणता येईल की 'चित्र के इश्कमें जीना, चित्र के इष्कमे मरना." कलावंताचं असं असणं हे कला जिवंत ठेवण्याच खरं लक्षण असतं. मायावी अस्तित्त्वाच्या पायावर कोणताही कलाविष्कार विरंतन होत नसतो. तो प्रासंगिक ठरतो. विरळ विरळ होतो. व्यक्ती जीवनातील क्षणाला रूप देणे म्हणजे त्या त्या घटनेला अजरामर करते. मूलभूत सत्याच्या आधारानं श्रीघर अंभोरे कार्यरत असतो. घरहीन संस्कृतीला रेषेतून जिवंत करणारा कलाकार म्हणून त्याचा कला समीक्षक विचार करीत असतो. कलेतील नवता, चित्रातील भाषा रेषांचे प्रकटीकरण आणि त्यातून दिसणारी भावनिकरूपं आस्वादकांची नवी नवी दृष्टी देत जातात. चित्र प्रत्ययासाठी देवालय कामी आणणे हा श्रीधर शैलीचा आणखी एक भाग. जे अर्थपूर्ण सुबोधासाठी जरूरीचा वाटतो. त्यातून अचूक अभिव्यक्ती होत जाते. जीवनाचं मोल मानणारा कलाकाराच वेगळ्या कलाकृती रसिकांना देऊ शकतो. श्रीधरच्या मनोवृत्तीचं निर्दशक काय तर ते प्रदेश वैशिष्ट्य. अभिजात मनोवृत्तीचा चित्रात गलबला असत नाही. तर काहीशी वैचारिक बंडखोरीत असते आणि ती दिसतेही. स्वीकारलेल्या एकाकीपणाचा सुंदर अपयोग करणारा तो एक कलावंत आहे. व्यासंगाचं पाठबळ नैसर्गिक कलाशक्तीला जसं जसं मिळत गेले तसा फुलत गेला. त्या क्षेत्रातील कोणतंही शिक्षण न घेता. मन सतत काळ्या रंगात तुडवून ठेवणारा श्रीधर चित्र कलेला वेगळे पैलू पाडतो. त्याचं त्यातील पूर्णपणे रंगणं बघण्यासारखं असतं. ज्याला आपण नैसर्गिक प्रतिभा म्हणतो ते रेषेच्या अंतरी दिसते. तिच्या कल्पनांची उंची कळते. नव्या कल्पनांचा जन्म होतो तोही निर्मलतेचा आव आणून नाही.
वैयक्तिक जीवनातील सुख दुःखाच्या छटा, हृदयीच्या आशा, मनातील वहस्थ, सापेक्ष प्रेमभावना, शोकार्त भाव यांच्या रेषातून माळ गुंफणे हे श्रीधरच्या जीवाचं जगणं आहे. ते आयुष्याशी एवढं निगडीत झालं आहे की चित्रच त्याला गणं गुणगुणायला भाग पाडतात. म्हणून त्याच्या रेषेची चमक उज्वल आहे. उज्ज्वलच राहील.

माणसाचा जेवढा तो उपासक आहे तेव्हढाच तो कलेचा उपासक आहे. त्यांचे हे छंदशास्त्र म्हणून वेगळे आगळे वाटते. (एक एक मेघाचा तुकडा जसा जसा वर जातो ते रेपाचित्र तपशिलात अडकून पडत नाही.) शिल्लक डोळ्यात उरते ती श्यामलकांती. तसंच काहीसं उन्मादी तरूणीचं असतं. मग ती सुखी अथवा दुःखी असो. त्याची त्या बाबतीत सहसंवेदना जागी झाली की, चित्रातील तिला उच्छृंखल भाव उरताना बघायला मिळत नाही. श्रीधर मनातील सौंदर्यशक्ती पावसाळी थेंब होऊन कागदावर उतरताना पक्षासारखे ठिबकतात. त्यातून बनते ती कलाकृती. त्यातील गुढता मनातल्या पुन्हा एका मनाला बोलके करते. (गळात घंटा बांधून नादमयी झालेले गायीचे पाय) त्याचं ते भावकाव्य असतं. आहे. त्यातील कलात्मकता शोधणे अभ्यासाचा एक भाग होतो. काळ्या रेषेतील आत्मपर उद्गाराचा स्वाभाविक आविष्कार असतो. ते एक वर्तन असते, नर्तन असते. ऋजूता असते. म्हणून प्रचलित चित्रापासून श्रीधर दूर राहू शकतो. शांत व निर्विकारपणे, माकडापासून मेढ्यापर्यंत आणि हाडकुळ्या पक्षापासून बैल, घोडे यांच्यापर्यंत तो

सगळ्यांना मस्त पकडून ठेवतो. मृदंग, पखवाज, दमडी, ढोलक या चर्मवाद्यांना तंद्री प्रदान करतो.

श्रीधर, असा हा मनस्वी कलावंत काल मानाचा मापदंड, करूणामूल्याची जाणीव असणारा. रेषा मूल्याचं भान ठेवणारा. आंधळ्या शहाणपणाला तराजूत तोलणारा. (पाखरांची चित्र काढताना वेगळी लिपी काढणारा तेवढाच व्याकूळ झालेला पाहिला मिळतो. तोही अपेक्षेपेक्षा जास्त.) सौंदर्यविष्कार हा कलासाधनेतून व्यक्त होत असतो. पूर्णार्थानं आकारातून एकमेकातील विविधतेची वीण कल्पनाशक्तीचा विचार करताना रंगनादाचं वर्तुख धुक्यासारखं डोळाभर पसरते. वास्तव. आवास्तव कळण्याआधी. श्रीधरची चित्र समजून घेताना त्यांच्या मनोविश्लेषणाचा अभ्यास करण्याची गरज पडतेच पडते. (देऊळाच्या कळसासारखं 'स्त्री' त्वाचं महत्त्व चित्रबद्ध करताना छातीवरील स्तनांना मडक्याचा आकार देतो. कारण मडक्यातील दुग्धजन्य पदार्थ त्याला अमृततुल्य वाटतात.) (पहा स्त्री प्रतिमा) हा त्याचा त्यानं केलेला अनुमानित प्रकार वाटतो. त्यातील स्थलकाळ निरपेक्षता मुखवट्याला आनंद बहाल करीत जाते. तो व्यक्त होताना निसर्ग पितो, माणूस वाचतो, समाज खोलीतही उतरतो, सहजगत्या स्वीकारलेल्या त्या त्या विषयात विक्रीनही झालेला दिसतो. (बोलका हिरवा बांध, खानदारी जनावरं, गळ्यातील दोर आणि घामानं न्हाऊन निघालेली माणसं, शेजारी मान टाकून विश्रांती घेत असलेली बैलगाडी) या मांडणीतून निर्माण होणारं अर्थपूर्ण
चित्र विलक्षण वाटतं. यातील आत्मियता लक्षात आली की बळी राजाची आत्मकथा उलगडायला लागते. लक्षात येते. तो चित्र निबंधच असतो.
................................
पुढारी 'दीपस्तंभ '
दिवाळी अंक २०२१
.................................
लेखक हे कवी आणि ज्येष्ठ संपादक आहेत. संपर्क ९६८९९१०९४९