श्रीधररेषा : देखणं कलाचिंतन

 

□ श्रीधररेषा : देखणं कलाचिंतन □



कवीचं माध्यम असतं भाषा तसं चित्रकाराचं माध्यम असतं रेषा.
कवी-चित्रकार ह्या दोन्ही कलावंतांच माध्यम -भान जेवढं सखोल असेल तेवढी त्यांची निर्मिती प्रगल्भ होत जाते. संवेदनेच्या भावतरल वळणावर कविता आणि चित्र यातली सीमारेषा परस्परात बेमालुम मिसळून त्या कलाकृतीचा गाभा एकजीव होतो. काहीसा असाच प्रत्यय श्रीधर अंभोरेची रेखाचित्र आपल्या डोळ्यांना देतात. आणि रेखाचित्रातील कविता आपल्या जाणीव -नेणीवेत
रूप धरू लागते.
नुकतीच श्रीधर अंभोरेंची  पंचाहत्तरी साधेपणाने साजरी झाली. या निमित्ताने मित्रांनी श्रीधर अंभोरेंना दिलेली अनोखी भेट म्हणजे
महावीर जोंधळे यांचं कलात्मचिंतन मांडणारं 'श्रीधररेषा ' हे
आगळंवेगळं आणि कमालीचं देखणं असलेलं पुस्तक.
अशा प्रकारची पुस्तकं मराठीत अत्यंत विरळी. म्हणूनच ती मौलिक आणि कलाविष्काराच्या आकलनात महत्वाची. महावीर जोंधळे याचं हे ललितचिंतन अप्रतिम उतरलं आहे.
पुस्तक हाती घेतल्यावर कलात्मक मांडणीला दाद देत डोळ्यांनी आधाशासारखं पान अन् पान पहात श्रीधर अंभोरेंच्या चित्रांचं सौंदर्य टिपावं... की महावीर जोंधळेचं शब्दांकन वाचत त्याला मनात अलगद झिरपू द्यावं अशी विलक्षण अनुभूती देणारं हे पुस्तक कलेवर नितांत प्रेम करणाऱ्या प्रत्येकाने विकत घेऊन वाचलंच पाहिजे.
.
□ श्रीधररेषा : महावीर जोंधळे
□ प्रस्तावना : प्रा. रणधीर शिंदे
□ पाठराखण : यशवंत मनोहर
□ शब्दशिवार प्रकाशन, मंगळवेढा 9423060112
□ मूल्य : १००