रेखाचित्रांचा बादशहा : श्रीधर अंभोरे : डॉ. अशोक रा. इंगळे

 


विदर्भभूमी अर्थात मुक्काम चिखलगाव, ता. पातूर जि. अकोला येथील रहिवासी असलेले चित्रकार श्रीधर अंभोरे होते. रेषा ह्या त्याचं प्राणतत्त्व होत्या. त्यांच्या रक्ताच्या डीएनए मध्ये देखील रेषाच गवसेल, त्यांच्या उत्कट भावाभिव्यक्तीचं प्रभावी संवादमाध्यम देखील रेषाच. म्हणून मी श्रीधर अंभोरेंना रेषाचित्रांचा बादशहा असं म्हटलं आहे. बादशहा म्हणजे सम्राट. रेषाचित्र कलेच्या क्षेत्रातील सर्वोच्च अधिकारी पुरुष असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. या अर्थानं ते संबोधन आलं आहे. अंभोरेंना रेषाचित्रांच्या संदर्भात ते संबोधन चपखल लागू पडतं. त्यासाठी फक्त या रेषांच्या या निबिड जंगलातून फिरून येणं गरजेचं ठरतं.

मूलतः अंभोरेंच्या चित्रांचा रंग हा कृष्णधवल स्वरूपाचा. आणि या पृथ्वीचा मूळ रंग देखील काळा आणि पांढरा. या दोन निसर्ग निर्मित रंगातून त्यांनी आपली लक्षवेधी चित्रसृष्टी निर्मिली. त्यामुळे अंतरग गाभ्यातून साकार झालेली ही निर्मिती अक्षरशः मनाला स्तंभित करणारी वाटते. ती डोळ्यांना ज्ञानाचे नवे चक्षु प्रदान करते. हे प्रज्ञाचक्षु सत्य स्वीकारतात आणि आपल्या रेषांच्या कवच कुंचल्यातून ते मांडतात देखील. त्यामुळे त्यांची रेखाचित्रे इतकी अद्भुत बनली आहेत. मानवी संवेदना प्रकट करणाऱ्या आणि प्रज्ञाचक्षूला ते विलक्षण दिपवून टाकतात एवढं मात्र खरं.

ज्याप्रमाणं कवितेत शब्द अर्थाचे वाहक बनून येतात. कवितेतील शब्दच माणसांच्या अंतर्मनातील भावना, संवेदना आणि विचार प्रकट करीत असतात. अगदी त्याप्रमाणं श्रीधर अंभोरेंच्या चित्रातील रेषा ह्या
सजीव बनून भावना, विचार आणि संवेदना वाहून नेतात. हा केवळ भावानुवाद नसतो. तर त्या चित्रातील रंग, लय व नादवृत्ती मनाला आकर्षित करते.

त्यामुळे तो कलारसिकांसोबत केलेला रेषासंवादच असतो. या रेषासंहितेतील संवादात एतद्देशीय कला संस्कृतीसह समग्र जीवनाचं दर्शन घडतं. अभोरेंना असलेलं सृष्टीज्ञान रेषांमधून अनुभूतीला येते. त्यांच्या या चित्रसृष्टीत भोवतालचा निसर्ग, गुरं, ढोरं, वाडा, गोठा, कामगार, स्त्रिया, पशू, पक्षी, काटेरी झाडं, झुडपं, कुत्र्यांची दिंडी, गाढवं, डुकरं, बकऱ्या, घोडे, गायी, बैल, भिकारी शोषित आणि वंचित अवस्थेतील असंख्य मानवी चेहरे ह्या रेषांमधूनच पाहायला मिळतात.

खरं म्हणजे १९७२ पासून चालू झालेला हा चित्रप्रवास २०२२ मध्ये सुवर्णमयी वर्षात आला असला तरी अव्याहतरित्या सुरूच आहे.

आज अंभोरेच्या चित्रांचं सूक्ष्म अवलोकन केल्यास या चित्रांनी परिवर्तनीय वळणे घेत, ही रेषाचित्र ग्लोबल वळणावर सशक्तपणे उभी आहेत. या चित्रांनी पंधरा देशाचा फेरफटका मारला आहे, असे गुगल इंजिन सर्च केल्यास लक्षात येईल.

जगात चित्रकलांमध्ये अनेक चित्रकार निपुण आहेत पण रेषाकला ही फक्त अंभोरेंची अद्भुतनिर्मिती आहे. असा चित्रप्रेमापोटी रेषामय झालेला चित्रकार भारतीय चित्रसृष्टीत विरळच म्हणावा लागेल. रेषामूल्याचं सजग भान असलेले अंभोरे हे मानवी मूल्यांचे जसे उपासक ठरतात, तसेच कलेचे देखील ते निस्सीम उपासक आहेत. म्हणूनच ते मानवी मनाचे सगळे आकार, विकार आणि भावाकार रेषांच्या चिमटीत पकडतात. या चित्रांना जी विलोभनीयता प्राप्त झालेली आहे, ती गूढरम्य नसून भावरम्य वाटते. अशा अनोख्या सौंदर्यसर्जक दृष्टीमुळं ही चित्र मानवी मनाचा कधी कब्जा घेतात, ते कळत सुद्धा नाही. इतकी ती रेषा अंतर्मनातून आलेली असते. दबलेल्या वंचित मनाची वेदना, विद्रोह आणि आक्रोश मांडते. असा मानवी जीवनाचा गोषवारा ह्या रेषेत दडलेला आहे. एकूणच काय तर विस्थापितांच्या विस्कटलेल्या जगण्याची मांडणी करणारी त्याची अस्तित्वरेषा आपल्या अस्मितेचा अर्थ उकलत जाताना दिसते. श्रीधर अंभोरेंच्या रेषांमधली सूचक भावनिर्मिती शोधून काढणं तसं अवघडच. तरीही ह्या रेषांच्या अंतरंगात मनुष्य शिरला की, त्या रेषा सहज उलगडत जातात, सौंदर्य आणि अर्थवत्ता याचा सुंदर अन्वय साधल्यामुळं या रेषांमधली कलात्मकता अधिक ठळक उठून दिसते. सामाजिक भान घेऊन आलेली ही रेषा सूक्ष्म अवलोकनातून कृषी, आदिवासी व भटक्या विमुक्तांच्या संस्कृतीला उजागर करते. वर्तमानाचा विचार केला तर एआय तंत्रज्ञानामुळे चित्रसृष्टी आमुलाग्र बदललेली असताना अंभोरे मात्र अजूनही पांढऱ्या कागदावर काळ्या रेघोट्या ओढतात. तरीही, ह्या रेषा कमालीच्या अद्भुत ठरतात. कारण ह्या रेषा अनुभवाच्या मुशीतून आलेल्या असतात. त्यांना गर्भित जीवनाचा, वाचन, चिंतनाचा स्पर्श लाभलेला असतो.

अंभोरेंच्या अफाट वाचन आणि निरीक्षण शक्तीमुळे ह्या रेषा सजीव होतात. आपल्याशी मनसोक्त गप्पा मारतात, बोलतात आणि मनमेंदूला अंतर्मुखही करतात. ह्या रेषांची ही एकतत्त्वीय शैली म्हणून चित्रसृष्टीत भिन्न अनुभूती देते. इतर अमूर्त चित्रांपेक्षा वेगळाच भाव प्रकट करते. ह्या चित्रांमुळे कविता, कथात्म वाङ्मय प्रकाराचा आशय अधिक समृद्ध बनतो. या कारणांमुळेच अंभोरेंच्या रेषांना अत्याधुनिक युगातही तेवढीच डिमांड असलेली जाणवते. श्रीधर अंभोरेंच्या रेषांमधली झाडं मुळात लक्षवेधी असतात. पशू, पक्षी, गायी, बकऱ्या, मोर, कावळे, जमिनीवर पडलेली साधी दगडं सुद्धा आपल्याला आकृष्ट करतात. सजीवनिर्जीव या प्राणी जगताच्या दोन महत्त्वाच्या बाजू, चित्रकारालाच त्याची खरी ओळख असते. अस्ताव्यस्त पडलेल्या दगडात सजीवता वाहती ठेवण्याचं कार्य ही रेषा करते. मोर हा जंगलातील इतर प्राण्यांसारखा एक पक्षी पण मोराचं हे राजवखीं नर्तन जेव्हा रेषांमधून प्रकट होते. तेव्हा ते मनाला मोहून टाकते. त्यांच्या रेषाचं आणखी एक वैशिष्ट्य असं की, ऋतुरंग केवळ हिरव्या, पिवळ्या, पांढऱ्या इत्यादी सप्तरंगातून दाखवता येतात. मात्र या परंपरागत भावनेला छेद देवून त्यांनी काळ्या रेषांना चित्रकलेच्या क्षितिजावर कोरले हा लक्षणीय बदल म्हणता येईल. खरं म्हणजे ह्या रेषांवर बोलण्यापेक्षा ह्या रेषांमध्ये मनसोक्त डुंबून जाणं कुणालाही आवडेल. इतक्या
ह्या रेषा लळा लावतात, हेही तितकंच सत्य आहे. असा हा माणूसवेडा चित्रकार आहे. त्यामुळं जिथं जिथं अमानुषता जाणवते तिथं त्यांची रेषा फटकारते. बाभुळबन त्यांच्या रेषांमध्ये हटकून येतंच.

कारण, लहानपणापासून त्यांच्या मनमेंदूत ते शिरलं आहे, त्यातून ही चित्रं गहिरं रूप धारण करतात. ठसठशीत वेदनेचा चेहरा रेखांकित करताना ते कधीही सुस्पष्ट दाखवत नाहीत, त्यामागचं कारण की, चेहरा हरवलेली माणसंच त्यांच्या अवती भोवताली वावरत असतात. म्हणूनही कदाचित त्यांच्या चित्रांना बहु‌दा चेहरा नसतोच. साधु संन्यासागत फिरणारं हे व्यक्तित्व सारखं राजकारणी नेत्यासारखं दौऱ्यावर असतं. त्यामुळे ते कुणाला
.....................................
श्रीधर अंभोरेंच्या रेषा करूणामय बुद्ध अफलातून रेखाटतात. श्रीधर अंभोरेंच्या रेषांमध्ये समाजशास्त्र, मानववंशशास्त्र, मानसशास्त्र आणि मानवी तत्त्वज्ञानाचं
संचित दडलेलं जाणवतं. शिवाय व्यक्तीच्या मुखावरील सांस्कृतिक भाव टिपणं भल्याभल्यांना जमत नाही, मात्र इथे तो भाव प्रकर्षानं प्रकट होतो. त्यामुळे ह्या रेषा एकतत्त्वीय दर्शन मांडत नाहीत तर बहुतत्त्वीय सांस्कृतिक जीवनाचं दर्शन घडवितात. म्हणूनच ह्या रेषा देश, प्रदेश ओलांडून अखिल मानव जातीला एका धाग्यात गुंफतात. दरकोस दर मुक्काम भटकणाऱ्या भटक्या विमुक्तांचं बिऱ्हाड ह्या रेषा अलगद टिपतात. मेंढरं, बकऱ्यांचा कळप हेरतात. स्त्रियांच्या झुंडी हेरतात. नदीवर दुःखाचं धुणं धुणाऱ्या बाया टिपतात. मोर्चातला वेदनामय आक्रोश अंकित करतात. करूणामय बुद्ध अफलातून रेखाटतात. एकतारी भजन कीर्तनातील वारकऱ्यांचा भक्तीभाव टिपतात. असंख्य आशयांनी वलयांकित झालेली रेषा उमेद हरवलेल्या माणसाला जगण्यासाठी ताठ कणा प्राप्त करून देते.
......................................

कुठे आणि कधीही भेटू शकतात. ह्या सगळ्या भेटींच्या परिपाकातूनच अंभोरेंची रेषा आकाराला येते. मानवदृष्टीनं सजीव ठरलेल्या रेषांमुळे अंभोरेंची ओळख सातासमुद्रापार गेली आहे. विदर्भाच्या मातीत जन्मास आलेला हा अवलिया रेषाचित्रकार विदर्भ अथवा महाराष्ट्रापुरता सिमित राहिला नसून; त्यांची ओळख ग्लोबल बनली आहे. गुगल सर्चइंजिनवर श्रीधर अंभोरे पाहायला, वाचायला मिळतात. अमेरिकेतील जागतिक कीर्तीच्या कलादालनात आठ वर्षांच्या चित्रकारापासून ते पाब्लो पिकासोपर्यंत सगळ्ळ्यांना एकत्र बघणं विलक्षण आनंद देणारी बाब म्हणावी लागते. त्या कलादालनात अभोरेंची रेषाचित्र मांडली मांडली गेली. जगातील समग्र रसिकांनी ती डोळ्यांनी अनुभवली, पाहिली तिची अनुभूती खरोखरच केवळ अभोरेंसाठी आनंददायी नव्हती. तर नॅशनल आर्ट गॅलरी, न्यूयॉर्क मधील चित्र पाहताना विदर्भाच्या मातीतील हरेकांसाठी आनंद देणारी बाब होती. एकंदरीत, सृष्टी आणि मानवाविषयी अपार कुतूहल आणि श्रद्धा असलेला हा आंतरराष्ट्रीय

दअॅजिंक्य भारत

12 Aug 2026 - Page 5

रेखाचित्रांचा बादशहा : श्रीधर अंभोरे

स्मृति

डॉ. अशोक रा. इंगळे मो. ९४२१७४७४१७

विदर्भभूमी अर्थात मुक्काम चिखलगाव, ता. पातूर जि. अकोला येथील रहिवासी असलेले चित्रकार श्रीधर अंभोरे होते. रेषा ह्या त्याचं प्राणतत्त्व होत्या. त्यांच्या रक्ताच्या डीएनए मध्ये देखील रेषाच गवसेल, त्यांच्या उत्कट भावाभिव्यक्तीचं प्रभावी संवादमाध्यम देखील रेषाच. म्हणून मी श्रीधर अंभोरेंना रेषाचित्रांचा बादशहा असं म्हटलं आहे. बादशहा म्हणजे सम्म्राट. रेषाचित्र कलेच्या क्षेत्रातील सर्वोच्च अधिकारी पुरुष असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. या अर्थानं ते संबोधन आलं आहे. अंभोरेंना रेषाचित्रांच्या संदर्भात ते संबोधन चपखल लागू पडतं. त्यासाठी फक्त या रेषांच्या या निबिड जंगलातून फिरून येणं गरजेचं ठरतं.

मूलतः अंभोरेंच्या चित्रांचा रंग हा कृष्णधवल स्वरूपाचा. आणि या पृथ्वीचा मूळ रंग देखील काळा आणि पांढरा. या दोन निसर्ग निर्मित रंगातून त्यांनी आपली लक्षवेधीचित्रसृष्टीनिर्मिली. त्यामुळे अंतरगाभ्यातून साकार झालेली ही निर्मिती अक्षरशः मनाला स्तंभित करणारी वाटते. ती डोळ्यांना ज्ञानाचे नवे चक्षु प्रदान करते. हे प्रज्ञाचक्षु सत्य स्वीकारतात आणि आपल्या रेषांच्या कवच कुंचल्यातून ते मांडतात देखील. त्यामुळे त्यांची रेखाचित्र इतकी अद्भुत बनली आहेत. मानवी संवेदना प्रकट करणाऱ्या आणि प्रज्ञाचक्षूला ते विलक्षण दिपवून टाकतात एवढं मात्र खरं.

ज्याप्रमाणं कवितेत शब्द अर्थाचे वाहकबनून येतात. कवितेतील शब्दच माणसांच्या अंतर्मनातील भावना, संवेदना आणि विचार प्रकट करीत असतात. अगदी त्याप्रमाणं श्रीधर अंभोरेंच्या चित्रातील रेषा ह्या

सजीव बनून भावना, विचार आणि संवेदना वाहून नेतात. हा केवळ भावानुवाद नसतो. तर त्या चित्रातील रंग, लय व नादवृत्ती मनाला आकर्षित करते.

त्यामुळे तो कलारसिकांसोबत केलेला रेषासंवादच असतो. या रेषासंहितेतील संवादात एतद्देशीय कला संस्कृतीसह समग्र जीवनाचं दर्शन घडतं. अभोरेंना असलेलं सृष्टीज्ञान रेषांमधून अनुभूतीला येते. त्यांच्या या चित्रसृष्टीत भोवतालचा निसर्ग, गुरं, ढोरं, वाडा, गोठा, कामगार, स्त्रिया, पशू, पक्षी, काटेरी झाडं, झुडपं, कुत्र्यांची दिंडी, गाढवं, डुकरं, बक-या, घोडे, गायी, बैल, भिकारी शोषित आणि वंचित अवस्थेतील असंख्य मानवी चेहरे ह्या रेषांमधूनच पाहायला मिळतात.

खरं म्हणजे १९७२ पासून चालू झालेला हा चित्रप्रवास २०२२ मध्ये सुवर्णमयी वर्षात आला असला तरी अव्याहतरित्या सुरूच आहे.

आज अंभोरेच्या चित्रांचं सूक्ष्म अवलोकन केल्यास या चित्रांनी परिवर्तनीय वळणे घेत, ही रेषाचित्र ग्लोबल वळणावर सशक्तपणे उभी आहेत. या चित्रांनी पंधरा देशाचा फेरफटका मारला आहे, असे गुगल इंजिन सर्च केल्यास लक्षात येईल.

जगात चित्रकलांमध्ये अनेक चित्रकार निपुण आहेत पण रेषाकला ही फक्त अंभोरेंची अद्भुतनिर्मिती आहे. असा चित्र प्रेमापोटी रेषामय झालेला चित्रकार भारतीय चित्रसृष्टीत विरळच म्हणावा लागेल. रेषामूल्याचं सजग भान असलेले अंभोरे हे मानवी मूल्यांचे जसे उपासक ठरतात, तसेच कलेचे देखील ते निस्सीम उपासक आहेत. म्हणूनच ते मानवी मनाचे सगळे आकार, विकार आणि भावाकार

रेषांच्या चिमटीत पकडतात. या चित्रांना जी विलोभनीयता प्राप्त झालेली आहे, ती गूढरम्य नसून भावरम्य वाटते. अश्या अनोख्या सौंदर्यसर्जक दृष्टीमुळं ही चित्र मानवी मनाचा कधी कब्जा घेतात, ते कळत सुद्धा नाही. इतकी ती रेषा अंतर्मनातून आलेली असते. दवलेल्या वंचित मनाची वेदना, विद्रोह आणि आक्रोश मांडते. असा मानवी जीवनाचा गोषवारा ह्या रेषेत दडलेला आहे. एकूणच काय तर विस्थापितांच्या विस्कटलेल्या जगण्याची मांडणी करणारी त्याची अस्तित्वरेषा आपल्या अस्मितेचा अर्थ उकलत जाताना दिसते. श्रीधर अंभोरेंच्या रेषांमधली सूचक भावनिर्मिती शोधून काढणं तसं अवघडच. तरीही ह्या रेषांच्या अंतरंगात मनुष्य शिरला की, त्या रेषा सहज उलगडत जातात, सौंदर्य आणि अर्थवत्ता याचा सुंदर अन्वय साधल्यामुळं या रेषांमधली कलात्मकता अधिक ठळक उठून दिसते. सामाजिक भान घेऊन आलेली ही रेषा सूक्ष्म अवलोकनातून कृषी, आदिवासी व भटक्या विमुक्तांच्या संस्कृतीला उजागर करते. वर्तमानाचा विचार केला तर एआय तंत्रज्ञानामुळे चित्रसृष्टी आमुलाग्र बदललेली असताना अंभोरे मात्र अजूनही पांढऱ्या कागदावर काळ्या रेघोट्या ओढतात. तरीही, ह्या रेषा कमालीच्या अद्भुत ठरतात. कारण ह्या रेषां अनुभवाच्या मुशीतून आलेल्या असतात. त्यांना गर्भित जीवनाचा, वाचन, चिंतनाचा स्पर्श लाभलेला असतो.

अंभोरेंच्या अफाट वाचन आणि निरीक्षण शक्तीमुळे ह्या रेषा सजीव होतात. आपल्याशी मनसोक्त गप्पा मारतात, बोलतात आणि मनमेंदूला अंतर्मुखही करतात. ह्या रेषांची ही एकतत्त्वीय शैली म्हणून चित्रसृष्टीत भिन्न अनुभूती देते. इतर अमूर्त चित्रांपेक्षा वेगळाच भाव प्रकट करते. ह्या चित्रांमुळे कविता, कथात्म वाङ्मय प्रकाराचा आशय अधिक समृद्ध बनतो. या कारणांमुळेच अंभोरेंच्या रेषांना अत्याधुनिक युगातही तेवढीच डिमांड असलेली जाणवते. श्रीधर अंभोरेंच्या रेषांमधली झाडं मुळात लक्षवेधी असतात. पशू, पक्षी, गायी, बक-या, मोर, कावळे, जमिनीवर पडलेली साधी दगडं सुद्धा आपल्याला आकृष्ट करतात. सजीवनिर्जीव या प्राणी जगताच्या दोन महत्त्वाच्या बाजू, चित्रकारालाच त्याची खरी ओळख असते. अस्ताव्यस्त पडलेल्या दगडात सजिवता वाहती ठेवण्याचं कार्य ही रेषा करते. मोर हा जंगलातील इतर प्राण्यांसारखा एक पक्षी पण मोराचं हे राजवखीं नर्तन जेव्हा रेषांमधून प्रकट होते. तेव्हा ते मनाला मोहून टाकते. त्यांच्या रेषाचं आणखी एक वैशिष्ट्य असं की, ऋतुरंग केवळ हिरव्या, पिवळ्या, पांढ-या इत्यादी सप्तरंगातून दाखवता येतात. मात्र या परंपरागत भावनेला छेद देवून त्यांनी काळ्या रेषांना चित्रकलेच्या क्षितिजावर कोरले हा लक्षणीय बदल म्हणता येईल. खरं म्हणजे ह्या रेषांवर बोलण्यापेक्षा ह्या रेषांमध्ये मनसोक्त डुंबून जाणं कुणालाही आवडेल. इतक्या

ह्या रेषा लळा लावतात हेही तितकंच सत्य आहे. असा हा माणूसवेडा चित्रकार आहे. त्यामुळं जिथं जिथं अमानुषता जाणवते तिथं त्यांची रेषा फटकारते. बाभुळबन त्यांच्या रेषांमध्ये हटकून येतंच.

कारण, लहानपणापासून त्यांच्या मनमेंदूत ते शिरलं आहे, त्यातून ही चित्रं गहिरं रूप धारण करतात. ठसठशीत वेदनेचा चेहरा रेखांकित करताना ते कधीही सुस्पष्ट दाखवत नाहीत, त्यामागचं कारण की, चेहरा हरवलेली माणसंच त्यांच्या अवती भोवताली वावरत असतात. म्हणूनही कदाचित त्यांच्या चित्रांना बहु‌दा चेहरा नसतोच. साधु संन्यासागत फिरणारं हे व्यक्तित्व सारखं राजकारणी नेत्यासारखं दौऱ्यावर असतं. त्यामुळे ते कुणाला

श्रीधर अंभोरेंच्या रेषा करूणामय बुद्ध अफलातून रेखाटतात श्रीधर अंभोरेंच्या रेषांमध्ये समाजशास्त्र, मानववंशशास्त्र, मानसशास्त्र आणि मानवी तत्त्वज्ञानाचं

संचित दडलेलं जाणवतं. शिवाय व्यक्तीच्या मुखावरील सांस्कृतिक भाव टिपनं भल्याभल्यांना जमत नाही, मात्र इथे तो भाव प्रकर्षानं प्रकट होतो. त्यामुळे ह्या रेषा एकतत्त्वीय दर्शन मांडत नाहीत तर बहुतत्त्वीय सांस्कृतिक जीवनाचं दर्शन घडवितात. म्हणूनच ह्या रेषा देश, प्रदेश ओलांडून अखिल मानव जातीला एका धाग्यात गुंफतात. दरकोस दर मुक्काम भटकणा-या भटक्या विमुक्तांचं बिराड ह्या रेषा अलगद टिपतात. मेंढरं, बक-यांचा कळप हेरतात. स्त्रियांच्या झुंडी हेरतात. नदीवर दुःखाचं धुणं धुणा-या बाया टिपतात. मोर्चातला वेदनामय आक्रोश अंकित करतात. करूणामय बुद्ध अफलातून रेखाटतात. एकतारी भजन कीर्तनातील वारक-यांचा भक्तीभाव टिपतात. असंख्य आशयांनी वलयांकित झालेली रेषा उमेद हरवलेल्या माणसाला जगण्यासाठी ताठ कणा प्राप्त करून देते.

कुठे आणि कधीही भेटू शकतात. ह्या सगळ्या भेटींच्या परिपाकातूनच अंभोरेंची रेषाआकाराला येते. मानवदृष्टीनं सजीव ठरलेल्या रेषांमुळे अंभोरेंची ओळख सातासमुद्रापार गेली आहे. विदर्भाच्या

मातीत जन्मास आलेला हा अवलिया रेषाचित्रकार विदर्भ अथवा महाराष्ट्रापुरता सिमित राहीला नसून; त्यांची ओळख ग्लोबल बनली आहे. गुगल सर्चइंजिनवर श्रीधर अंभोरे पाहायला, वाचायला मिळतात. अमेरिकेतील जागतिक कीर्तीच्या कलादालनात आठ वर्षांच्या चित्रकारापासून ते पाब्लो पिकासोपर्यंत सगळ्ळ्यांना एकत्र बघणं विलक्षण आनंद देणारी बाब म्हणावी लागते. त्या कलादालनात अभोरेंची रेषाचित्र मांडली मांडली गेली. जगातील समग्र रसिकांनी ती डोळ्यांनी अनुभवली, पाहिली तिची अनुभूती खरोखरच केवळ अभोरेंसाठी आनंददायी नव्हती. तर नॅशनल आर्ट गॅलरी, न्यूयॉर्क मधील चित्र पाहताना विदर्भाच्या मातीतील हरेकांसाठी आनंद देणारी बाब होती. एकंदरीत, सृष्टी आणि मानवाविषयी अपार कुतूहल आणि श्रद्धा असलेला हा आंतरराष्ट्रीय
दर्जाचा कलावंत बाया, माणसं व सृष्टीतील पशू, पक्षी, प्राण्यांना मनसोक्त रेखाचित्रांच्या कवेत हुबेहुब रेखाटतो. त्यामुळे त्यांची चित्र मनात सतत कुतूहल जागवत राहतात.